Chanakya Niti: तोंडावर गोड बोलणाऱ्या धोकेबाज लोकांना कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितली तब्बल 8 सुत्र

Sakshi Sunil Jadhav

बदलेली वृत्ती

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. मात्र काही वेळा आपल्या प्रगतीत अडथळा ठरणारे लोक हे आपल्याच आसपास असतात. त्यांना ओळखणं गरजेचं आहे.

identify fake people

व्यक्तीची खरी ओळख

जशी सोन्याची शुद्धता तपासली जाते, तसाच माणसाचा स्वभाव त्याच्या त्याग, ज्ञान त्याच्या कृतीतून दिसतं.

sweet talking people

अतिगोड बोलणारे लोक

जो व्यक्ती खूप गोड बोलतो तो नेहमीच प्रामाणिक असेलच असे नाही. ‘विषकुंभ पयोमुखम्’ म्हणजे वरून गोड पण आतून विषारी असू शकतो.

ancient Indian wisdom

समोर कौतुक, मागे निंदा

धोकेबाज लोक तुमच्या समोर स्तुती करतात, पण तुमच्या गैरहजेरीत वाईट बोलतात. अशा लोकांपासून अंतर ठेवा.

ancient Indian wisdom

तुमची कमजोरी

स्वार्थी लोक तुमच्या कमतरता जाणून घेतात आणि योग्य वेळी त्याचा फायदा घेतात.

ancient Indian wisdom

छोट्या लालसेतून घ्या परीक्षा

चाणक्य म्हणतात, एखाद्याला छोटा मोह दाखवा. तो जर तुमच्या हिताला धक्का देत असेल तर तो विश्वासू नाही.

how to deal with toxic people

वैयक्तिक आणि गुप्त माहिती

आपले गुपित सर्वांना सांगू नका. गुपित जाणणारा खोटा मित्र शत्रूपेक्षा अधिक धोकादायक असू शकतो.

how to deal with toxic people

संकटात साथ देणारा

जो अडचणीच्या वेळी साथ सोडतो, तो कधीही आपला हितचिंतक नसतो. कडवे सत्य सांगणारा मित्रच खरा असतो.

how to deal with toxic people

खूप सरळ राहू नका

चाणक्यांच्या मते, जंगलात सरळ झाडे आधी तोडली जातात. त्यामुळे जीवनात शहाणपण आणि चातुर्य आवश्यक आहे.

how to deal with toxic people

NEXT: Natural Hair Care: कंडिशनिंग सोडा! केसांसाठी फक्त १ गोष्ट वापरा; कोरडे-फ्रिझी केस होतील सॉफ्ट आणि चमकदार

homemade conditioner
येथे क्लिक करा