Chanakya Niti: समोरचा खोटं बोलतोय की खरं कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितले 7 अचूक मार्ग

Sakshi Sunil Jadhav

चाणक्य निती

आजच्या जगात खोटं बोलणं सामान्य झालं असलं, तरी आचार्य चाणक्यांनी खोटं आणि खरं ओळखण्याचे सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत.

Chanakya Niti | Social media

डोळ्यांची हालचाल

चाणक्य म्हणतात, डोळे मनाचा आरसा असतो. खोटं बोलताना लोकं नजर चुकवतात, वारंवार इकडे-तिकडे पाहतात किंवा पापण्या सतत उघडझाप करतात.

Chanakya Niti | saam tv

नजर न स्थिर राहणं

जर समोरचा व्यक्ती बोलताना सतत खाली बघत असेल किंवा नजर स्थिर ठेवू शकत नसेल, तर तो काहीतरी लपवतोय.

Chanakya Niti

खोटं हसू ओळखा

खोटं बोलणाऱ्यांचं हसणं फक्त ओठांपुरतंच मर्यादित असतं. डोळ्यांत आनंद नसतो. चेहरा ताणलेला, जबडा घट्ट किंवा ओठ थरथरत असतील, तर हे खोटेपणाचं लक्षण मानलं जातं.

Chanakya Niti | google

वारंवार ओठ चाटणं

चाणक्य नितीनुसार खोटं बोलताना व्यक्ती अस्वस्थ होतात. त्यामुळे वारंवार ओठ चाटते, गळा साफ करतात किंवा तोंड झाकण्याचा प्रयत्न करतात.

Chanakya Niti | Saam TV

शरीराची भाषा

हात-पाय हलवणं, बोटं मोडणं, हात घासणं, खांदे उडवणं किंवा मान मागे घेणं हे सर्व खोटेपणाचे संकेत आहेत. सत्य बोलणारी व्यक्ती शांत आणि स्थिर असते.

Chanakya Niti | Social media

पायांची हालचाल

चाणक्य सांगतात की खोटं बोलताना पाय अस्वस्थ होतात. पाय हलणं, बोटं वाकडी होणं किंवा जागेवर तडफडणं हे मानसिक तणावाचं लक्षण आहे.

Chanakya Niti

खोट्याचा पुरावा

खोटं बोलणारी व्यक्ती आधी एक आणि नंतर वेगळी गोष्ट सांगते. ती अनावश्यक जास्त माहिती देते, जेणेकरून तिची गोष्ट खरी वाटावी.

Chanakya death mystery | saam tv

NEXT: Jio ग्राहकांसाठी खुशखबर; डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा फक्त 75 रुपयांत

NEXT : Jio Plan : फक्त ७७ रुपयांत जिओचा नवा प्लॅन; मिळणार ३ जीबी डेटा अन् बरंच काही
येथे क्लिक करा