Sakshi Sunil Jadhav
प्रत्येकालाच वाटतं की, आपल्या मागे लोकांनी चांगलं वागलं पाहिजे. त्यामुळे सगळेच चांगलं वागणं, शांत राहण्याचा मार्ग निवडतात.
चाणक्य म्हणतात भविष्यात यशस्वी व्हायचं असेल तर बदलत्या वेळेनुसार आणि प्रसंगानुसार वागण्यात बदल केला पाहिजे.
गुरु चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि यशाचा मार्ग दाखवणारे थोर गुरु मानले जातात.
चाणक्य नितीमध्ये यशस्वी आणि संतुलित चाणक्यांनी काही महत्वाची आयुष्यात फायदेशीर ठरणारी सुत्र सांगितली आहेत.
चाणक्यांच्या मते, सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करताना बऱ्याचदा स्वतःच्या विचारांशी आणि तत्त्वांशी अजिबात तडजोड करावी लागते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये कोल्ह्यासारखं चातुर्य, कावळ्यासारखी बुद्धिमत्ता आणि सिंहासारखा निर्भिडपणा असायला हवा. त्याने कोणत्याही आव्हानांना तुम्ही सामोरं जाल.
स्वभावाने शांत राहा पण लोकांच्या नजरेत कमकुवत होऊ नका. स्वतःची क्षमता आणि आत्मविश्वास योग्य वेळी दाखवा.
चाणक्यांच्या मते, कोणतीही युक्ती किंवा रणनीती वापरताना तिच्यामागील हेतू योग्य असावा. चांगल्या उद्देशाने केलेले कार्य समाजासाठी आणि स्वतःसाठी फायदेशीर ठरते.
गोड बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. लोकांचे शब्द नाही, तर त्यांची नीयत ओळखणं महत्त्वाचे आहे. तसेच स्वतःच्या योजना गुप्त ठेवणं हेही यशाचे महत्त्वाचे सूत्र आहे.