Sakshi Sunil Jadhav
भारतीय इतिहासातील महान राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिच्या माध्यमातून जीवनाचे गहन सत्य सांगितले आहे.
चाणक्यांनी काही अशा गोष्टींबद्दल सांगितलं आहे, ज्यांना त्यांनी मृत्यूसमान म्हटलं आहे. कारण अशा गोष्टी जीवनातील आनंद, स्थैर्य आणि मानसिक शांती हळूहळू नष्ट करतात.
जर पत्नीकडून सतत भांडणं, मत्सर आणि अनादर होत असेल, तर त्या घरात कधीही सुख टिकत नाही. अशा घरातील पुरुषाचं मन कायम तणावाखाली असतं.
जो मित्र बाहेरून हसतो पण आतून शत्रू असतो, तो सर्वात धोकादायक असतो. चाणक्यांच्या मते, असा मित्र जीवनात आत्मघातक ठरतो कारण तो विश्वास, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास नष्ट करतो.
जो नोकर प्रत्येक गोष्टीत वाद घालतो, काम टाळतो किंवा मालकाशी उद्धटपणे वागतो, तो घरातील शांतता बिघडवतो. असा माणूस नोकरीचं नव्हे तर संपूर्ण वातावरणाचं नुकसान करतो.
चाणक्य म्हणतात, जिथे सतत धोका असतो. जसे की साप, शत्रू किंवा भीतीचं वातावरण तिथे राहणं म्हणजे मृत्यूसारखं जगणं. अशा घरात मानसिक शांती कधीच मिळत नाही.
स्वार्थासाठी जवळ येणारे पण संकटात दूर जाणारे नातेवाईक हे शत्रूपेक्षाही वाईट असतात. ते तुमच्या विश्वासाचा गैरवापर करून तुमचं नुकसान करू शकतात.
वाईट लोकांच्या संपर्कात राहिल्याने विचारसरणी आणि आचरण दोन्ही बिघडतात. चाणक्य म्हणतात, अशा संगतीत राहणं म्हणजे स्वतःच्या विनाशाचं निमंत्रण.
जो इतरांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करतो किंवा दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद घेतो, तो समाजासाठी विषासमान आहे. अशा लोकांपासून दूर राहणं हेच बुद्धिमत्तेचं लक्षण आहे.