ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा धावपळ किंवा बाहेर असल्यामुळे ब्रश ऐवजी माऊथवॉशचा वापर केला जातो.
माऊथवॉश वापल्यानंतर तुम्हाला एकदम फ्रेश आणि रिलॅक्स वाटतं. परंतु, माऊथवॉश वापरल्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
सारखं माऊथवॉशचा वापर केल्यामुळे तुमच्या तोंडामध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
'फ्यूसोबॅक्टेरियम न्यूक्लिएटम' आणि 'स्ट्रेप्टोकोकस अँजिनोसस' या बॅक्टेरियांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
माऊथवॉश बनवण्यासठी अल्कोहोलचा वापर केला जातो ज्यामुळे तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
माऊथवॉश मध्ये कृत्रिम घटक देखील आढळतात ज्यामुळे शरीराला हानि होऊ शकते.
माऊथवॉश वापरल्यामुळे डोक्याचा आणि मानेच्या कॅन्सरचा धोका वाढतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.