ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा अर्चना करण्याला विशेष महत्त्व आहे.
श्रावणात महादेवाची मनापासून सेवा केल्यास तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल.
श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं आहे या काळात तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे.
श्रावणात दर सोमवारी अनेक भक्त महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा आणि अभिशेक करतात.
मात्र तुमच्या घरात नकारात्मकता किंवा आर्थिक चणचण भासत असेल तर हा उपाय नक्की करा.
संध्याकाळी पूजा करताना देवासमोर तूपाचा दिवा लावा आणि तो दिवा घरातील सर्व जागी फिरवा.
त्यानंतर घरामध्ये कापूर जाळा महादेवाला कापूरचा सुगंध खूप प्रिय आहे. असे केल्यास घरातील सकारात्मकता वाढेल.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.