Chetan Bodke
सिनेसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचा साखरपुडा झाला पण लग्न होऊ शकले नाहीत.
बॉलिवूडसह टॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे या यादीमध्ये नाव आहेत.
उपन पटेल आणि करिश्मा तन्नाची जोडी बिग बॉसमध्ये झाली होती. हे कपल बरेच दिवस चर्चेत होते. पण त्यांचे लग्न होऊ शकले नाही.
रश्मिका मंदान्ना आणि रक्षित शेट्टी यांचा साखरपुडा झाला, लग्नाचीही जोरदार चर्चा झाली पण या कपलने लग्न न करण्याचा निर्णय झाले.
अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचा साखरपुडाही झाला होता. पण ते लग्नाआधीच वेगळे झाले.
साजिद खान आणि गौहर खान हे सुद्धा साखरपुड्यानंतर वेगळे झाले.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्याही लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या, पण या कपलचे लग्न झाले नाही.
सलमान खान आणि संगीता बिजलानी यांच्या लग्नाचीही तयारी झाली होती. पण काही कारणास्तव त्यांचं लग्न तुटले.
बिग बॉसमधील लव्हबर्ड एजाज खान आणि पवित्रा पुनिया हे लग्न करणार होते. पण हे कपल आता वेगळे झाल्याचे चर्चा होत आहे.