Aamir Khan Net Worth: आलिशान घर, लक्झरी गाड्या...; तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणाऱ्या आमिर खानची संपत्ती किती?

Shruti Vilas Kadam

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट

बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आणि बेंगळुरूची फॅशन डिझाईनर गौरी स्प्रॅट आज लग्न करणार आहेत. आमिर खानने आजवर अनेक हीट चित्रपट दिले आहेत. पण आमिर खानची संपत्ती किती तुम्हाला माहिती आहे का?

Aamir Khan Net Worth | Saam Tv

मुंबईतील आलिशान सी-फेसिंग घर

आमिरचे मुंबईतील वांद्रे परिसरात समुद्रकिनाऱ्याकडे तोंड असलेले आलिशान निवासस्थान असून त्याची किंमत सुमारे 60 कोटी असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्याच्याकडे मुंबईत इतरही मालमत्ता आहेत.

Aamir Khan Net Worth

पंचगणीतील सुंदर फार्महाऊस

गर्दीपासून दूर राहण्यासाठी आमिरकडे पंचगणी येथे प्रशस्त फार्महाऊस आहे. सुट्टी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो या ठिकाणी जात असल्याचे म्हटले जाते.

Aamir Khan | yandex

लक्झरी कारचे खास कलेक्शन

आमिर खानकडे Mercedes-Benz S600, Rolls-Royce Ghost, Bentley Continental Flying Spur आणि इतर अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन असल्याचे अहवालांमध्ये नमूद आहे.

Aamir Khan | yandex

कमाईचे विविध स्रोत

चित्रपटांमधील मानधन, स्वतःची निर्मिती संस्था, ब्रँड जाहिराती, रॉयल्टी आणि रिअल इस्टेटमधील गुंतवणूक हे आमिरच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत.

Aamir Khan

रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक

मुंबईतील अनेक अपार्टमेंट्ससह उत्तर प्रदेशातील काही पूर्वजांची घरे आणि इतर मालमत्तांमध्येही आमिरने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे त्याचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ अधिक मजबूत झाला आहे.

Aamir Khan | Social Media

तब्बल 1,800 कोटींहून अधिक संपत्ती

आमिर खानची एकूण संपत्ती सुमारे 1,800 ते 1,862 कोटी असल्याचे विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. अभिनय, निर्मिती, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतून त्याने ही संपत्ती उभी केली आहे.

Aamir Khan | Instagram

Skin Care: महागड्या स्किनकेअरशिवाय मिळवा गुलाबी ग्लो; फक्त रोज सकाळी प्या 'हा' हेल्दी ज्यूस

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा