Manasvi Choudhary
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री रूपाली भोसले महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्धीझोतात आलेली आहे.
या मालिकेमध्ये, रूपालीने संजनाची भूमिका साकारली आहे.
कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या रूपालीने नुकतंच इन्स्टाग्रामवर खास फोटोशूट शेअर केलं आहे.
स्टायलिश अंदाजामध्ये रूपालीने जांभळ्या नऊवारी साडीत फोटोशूट केलं आहे.
ग्लॉसी मेकअपसह रूपालीने हेअरस्टाईल असा लूक केला आहे.
रूपालीच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.