Manasvi Choudhary
आधारकार्ड अपडेट करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमचे आधारकार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्ही सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही.
सरकारी योजनेचे पैसे खात्यात येत नाही अशी अनेकांची तक्रार असते याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बँक खात्यांमधील चुकीची माहिती. जर तुमचा नाव, जन्मतारिख किंवा मोबाईल नंबर वेगळा असेल तर पडताळणी करणे कठीण असते.
आजकाल एलपीजी अनुदान, पेन्शन, शिष्यवृत्ती, पीएक किसान, रेशनकार्ड यासांरखा अनेक सरकारी योजनांसाठी आधार लिंकिग अनिवार्य केले आहे.
सरकारतर्फे आधारकार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे पैसे येतात. मात्र तुमचे आधार कार्ड जर बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
बँक आधारकार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता ते कसे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
१)बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासण्यासाठी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या
२) त्यानंतर आधार आणि बँक खाते पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि OTP टाका. OTP टाकल्यानंतर आधार बँकेशी लिंक आहे की नाही हे स्किनवर दिसेल.
३) हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. मोबाईल किंवा लॅपटॉपमधून तुम्ही सहजपणे तपासू शकता.
४) बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासल्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन आधार सीडिंग करू घ्यावे.
५) अनेक बँकामध्ये ऑनलाईन आधार लिंकची प्रोसेस असते तुम्ही नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग करू शकता.