Dhanshri Shintre
ताजेतवाने सुरुवातीसाठी आजच ट्राय करा मूग डाळ इडली. चविष्ट, आरोग्यदायक आणि झटपट तयार होणारी ही इडली घरच्याघरी बनवा सहजपणे.
१ कप मूग डाळ, तांदूळ, १/४ कप उडीद डाळ, आले, मीठ, पाणी वापरून झटपट इडली तयार करा.
सुरुवातीला मूग डाळ, उडीद डाळ वेगवेगळे भिजवा, नंतर स्वच्छ धुवून पाणी गाळून घ्या.
भिजवलेली डाळ-तांदूळ थोड्या पाण्यात वाटून मऊ पीठ तयार करा, पीठ खूप पातळ किंवा जाड नसावे.
पीठात मीठ घालून नीट मिसळा, झाकून एका भांड्यात ठेवा आणि ते आंबण्यासाठी रात्रभर बाजूला ठेवा.
सकाळी पीठ चांगले आंबल्यावर इडली साच्यात ओता आणि इडल्या वाफवण्यासाठी ठेवून द्या.
इडली शिजल्यावर गरमागरम इडली नारळाच्या चटणी किंवा गरम सांबारसोबत सर्व्ह करा आणि स्वादिष्ट नाश्त्याचा आनंद घ्या.