Financial Planning: थोडं शहाणपण, थोडं नियोजन... आणि मासिक बचत होईल सोपी! जाणून घ्या ७ प्रभावी उपाय

Dhanshri Shintre

ठराविक रक्कम

महिन्याच्या सुरुवातीलाच ठराविक रक्कम बाजूला काढा, म्हणजे अनावश्यक खर्च टाळून बचत शक्य होते.

मासिक नियोजन

खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी गरजेचे आणि नको असलेले खर्च वेगळे ओळखा आणि त्यानुसार मासिक नियोजन करा.

खर्चावर नियंत्रण ठेवा

खरेदी करताना थांबा आणि विचार करा – "ही गोष्ट गरजेची आहे का?" अशा विचारांनी खर्चावर नियंत्रण ठेवता येतं.

ऑनलाइन खरेदी टाळा

ऑनलाइन खरेदी करताना लगेच पैसे देण्याऐवजी काही वेळ थांबा, विचार करा, मगच निर्णय घ्या.

ऑफर्सचा उपयोग करा

खरेदी करताना कॅशबॅक, कूपन्स आणि सवलतींचा विचारपूर्वक वापर करा, यामुळे बचतीत नक्कीच वाढ होईल.

खर्चाचा आढावा घ्या

प्रत्येक आठवड्याला खर्चाचे विश्लेषण करा आणि खर्च नियंत्रणासाठी एखाद्या ट्रॅकिंग अ‍ॅपचा वापर नियमितपणे करा.

घरगुती खर्चाचे बजेट ठरवा

मासिक बजेट तयार करून त्यानुसार शिस्तबद्ध खर्च करा.

NEXT: मुलांचे भविष्य सुरक्षित करा! 'या' ५ योजना ठरू शकतात सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय

येथे क्लिक करा