Breast cancer: कोणत्याही प्रकारची वेदना न होणंही धोक्याचं; ब्रेस्ट कॅन्सरच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच!

Surabhi Jayashree Jagdish

स्तनातील गाठ

महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या आजाराबाबत जागरूकता असणं महत्त्वाचं आहे. अनेक महिलांना स्तनामध्ये गाठ जाणवते पण वेदना होत नसल्यामुळे त्या त्याकडे दुर्लक्ष करतात.

Breast lump causes | saam tv

धोका नाही, हा समज चुकीचा

स्तनातील गाठ म्हणजे नेहमीच कॅन्सर असतो असं नाही, पण गाठ दुखत नाही म्हणून धोका नाही असंही समजू नये. तज्ज्ञांच्या मते स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं ओळखणं आणि योग्य वेळी तपासणी करणं महत्त्वाचं आहे.

Early detection of breast cancer | saam tv

काखेत वेदनारहित सूज

स्तनाच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील गाठ अनेकदा वेदनारहित असू शकते. त्यामुळे स्तनामध्ये किंवा काखेत दुखत नसलेली गाठ किंवा सूज जाणवली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर तपासणी केल्यास आजाराचं निदान लवकर होण्यास मदत होते.

Breast health for women | saam tv

स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको

अनेक महिला घरातील कामं आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्यात आपला बराच वेळ घालवतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या अनेकदा स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढत नाहीत. मात्र स्वतःच्या शरीरात होणारे बदल ओळखणं आणि गरज पडल्यास डॉक्टरांकडे जाणं तितकंच महत्त्वाचं आहे.

Painless armpit lump | saam tv

संकोच करू नका

अनेक कुटुंबांमध्ये स्तनांच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यामुळे काही महिला शरीरात जाणवणारे बदल पतीला किंवा कुटुंबातील इतर महिलांना सांगण्यास संकोच करतात. मात्र असा संकोच बाजूला ठेवून लक्षणांबद्दल बोलणं आणि गरजेनुसार वैद्यकीय मदत घेणं आवश्यक आहे.

Mammography screening | saam tv

जागरूकतेचा अभाव

ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्तनांची स्वतः तपासणी कशी करावी याची पुरेशी माहिती नसते. दुर्गम भागांमध्ये मॅमोग्राफीसारख्या तपासण्यांच्या सुविधा सहज उपलब्ध नसल्यामुळेही अडचणी येऊ शकतात. स्तनाच्या कॅन्सरबाबत जनजागृती वाढवणं आणि महिलांना तपासणीच्या सुविधा उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे.

Breast cancer early symptoms | saam tv

डॉक्टरांचा सल्ला

महिलांनी दर महिन्याला स्तनांमध्ये काही नवीन बदल जाणवतात का याकडे लक्ष द्यावं. शिवाय मासिक पाळी संपल्यानंतर स्वतःच्या स्तनांची तपासणी करावी. स्तनामध्ये नवीन किंवा कठीण गाठ, आकारात बदल किंवा निप्पलमधून असामान्य स्राव येणं अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Importance of early diagnosis | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- Breast cancer medical advice | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

early heart attack signs | saam tv
येथे क्लिक करा