ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या घरात असा एक जीव आहे ज्याचं डोकं कापल्यानंतर देखील तो जीवंत राहतो. हा दुसरा तिसरा कोणी नसून झुरळ आहे.
झुरळे मानवांपेक्षा १० पट जास्त रेडिएशन सहन करू शकतो. म्हणजेच न्यूक्लियर बॉम्बेच्या स्फोटानंचरही त्यांना काहीही होणार नाही.
झुरळे त्यांचे डोके कापल्यानंतरही ७ दिवस जिवंत राहू शकतात.
झुरळं ही केवळ दमट भाग आणि ओलसर भागातच जिवंत राहतात. त्यांचं डोके कापल्यानंतर तहानेने मरतात.
झुरळे ३५० दशलक्ष वर्षांपूर्वीपासून या पृथ्वीवर अस्तित्वात आहेत.
झुरळे १ सेकंदात १०० सेंटीमीटरपर्यंत धावू शकतात.
झुरळ कोणतंही खाणं खाऊ शकतात. कागद, कपडे, केस, साबण इत्यादी खातात.