Blood group: 'या' ब्लड ग्रुपला हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो जास्त

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड ग्रुप

प्रत्येकाचा एक ब्लड ग्रुप असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, हा ब्लड ग्रुप तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो.

हार्ट अटॅक

आजकाल हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. चुकीची जीवनशैली किंवा अयोग्य आहारामुळे हार्ट अटॅक येतो असं आपण मानतो. मात्र तुम्हाला माहितीये का की, तुमचा ब्लड ग्रुप देखील याला कारणीभूत असू शकतो.

नवं संशोधन

नुकत्याच केलेल्या काही संशोधनामधून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासामधून काही खास ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना हार्ट अटॅक किंवा रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असल्याचं समोर आलंय.

काय सांगतं संशोधन?

एका मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात सुमारे ४ लाख लाख लोकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. यामध्ये काही विशिष्ट रक्तगट असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका ८ टक्क्यांनी जास्त असल्याचं समोर आलं.

२०१७ मधील संशोधन

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीने २०१७ मध्ये एक संशोधन केलं होतं. यामध्ये काही रक्तगट असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येण्याचा धोका ९ टक्क्यांनी जास्त असल्याचं समजलं होतं.

व्हॉन विलिब्रँड फॅक्टर

संशोधनानुसार, काही विशिष्ट ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींमध्ये व्हॉन विलिब्रँड फॅक्टर प्रोटीन प्रमाण अधिक असल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा होण्याचा धोका तब्बल ४४ टक्क्यांनी वाढत असल्याचं निदर्शनास आलं.

कोणत्या रक्तगटाला जास्त धोका?

O रक्तगट वगळता इतर सर्व रक्तगटांमध्ये म्हणजेच A, B आणि AB यांना हार्ट अटॅख आणि रक्ताच्या गाठी होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो, असं संशोधक सांगतात. यामध्ये बी ब्लड ग्रुपला १५ टक्के तर ए ब्लड ग्रुपला हार्ट अटॅक येण्याचा धोका ११ टक्क्यांनी जास्त असतो.

Bra design: ब्रामध्ये एकसारखे 3 हुक का असतात? 99 टक्के मुलींनाही माहिती नसेल कारण

Bra design | SAAM TV
येथे क्लिक करा