Manasvi Choudhary
आहारात काकडी, टरबूज आणि संत्री या फळांचा समावेश करा. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. जे मूत्रपिंडाच्या गाळण प्रक्रियेस मदत करतात आणि लघवीमध्ये खडे तयार होण्यास प्रतिबंध करतात.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी ही फळे खा. बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करू शकतात.
पालक, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे आहारात समावेश करा. या भाज्यांमधून शरीराला फायबर, फोलेट, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स मिळतात.
स्वयंपाकासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापरा. ऑलिव्ह ऑइल रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करते. किडनीसाठी देखील ऑलिव्ह ऑइल फायदेशीर मानले जाते.
दही मध्यम प्रमाणात उच्च-गुणवत्तेचे प्रथिने, तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स पुरवते. योग्य प्रमाणात दहीचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
मुळा आणि बीटरूटमध्ये असणारे पौष्टिक घटक रक्ताभिसरण सुधारतात आणि शरीरातील टॉक्सिन्स लघवीवाटे बाहेर टाकण्यास किडनीला मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.