Shreya Maskar
साडी, लेहेंगा, पैठणी किंवा नऊवारी नेसताना सुंदर हेअरस्टाइलसोबत योग्य हेअर ॲक्सेसरीज वापरल्यास पारंपरिक लूक अधिक खुलून दिसतो.
गजरा हा पारंपरिक भारतीय लूकमधील सर्वात लोकप्रिय हेअर ॲक्सेसरीजपैकी एक आहे. मोगरा किंवा जाईच्या फुलांचा गजरा केसांच्या अंबाड्यावर किंवा वेणीवर माळा. सणासाठी ताज्या फुलांचा गजरा, तर दीर्घकाळ टिकणाऱ्या लूकसाठी कृत्रिम फुलांचा गजरा निवडा.
सोन्याच्या रंगातील नक्षीदार हेअर पिन्समुळे साध्या हेअरस्टाइललाही आकर्षक लूक मिळतो. पानांच्या आकाराच्या, मोत्यांच्या किंवा पारंपरिक नक्षीकामाच्या पिन्स साडीवर सुंदर दिसतात.
मांग टीका कपाळाच्या मध्यभागी लावला जातो. पारंपरिक दागिन्यांमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे. कुंदन, पोल्की, मोती आणि गोल्ड प्लेटेड डिझाइनमध्ये तो उपलब्ध असतो.
जडाऊ किंवा कुंदन वर्क असलेला हेअर कंगवा अंबाड्याच्या बाजूला किंवा मागच्या बाजूस लावता येतो. यामुळे केसांमध्ये सुंदर उठाव येतो आणि लूक अधिक समृद्ध दिसतो.
मोत्यांच्या हेअर पिन्स, मोत्यांची हेअर चेन किंवा मोत्यांनी सजवलेले बन ॲक्सेसरीज यामुळे साध्या हेअरस्टाइललाही नाजूक आणि आकर्षक लूक मिळतो. पेस्टल साडी, शिफॉन साडी, अनारकली आणि हलक्या रंगांचा लेहेंगा परिधान केल्यावर नक्की ट्राय करा.
वेणीमध्ये लावले जाणारे सोन्याच्या रंगाचे दागिने, फुलांच्या आकारातील क्लिप्स आणि पारंपरिक वेणी ॲक्सेसरीज मराठमोळ्या लूकसाठी उत्तम आहेत. काही डिझाइनमध्ये मोती किंवा लाल-हिरव्या खड्यांचाही वापर केलेला असतो.