Saam Tv
मकर संक्रांत हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो. हा सण १४ जानेवारीला साजरा केला जातो.
या दिवसांमध्ये सर्व महिला हलव्याचे दागिने परिधान करतात. तसेच घरात गोड आणि पौष्टीक पदार्थ तयार करतात.
आज आपण अशाच पांरपारिक गोड पदार्थ जे संक्रांतीला तयार केले जातात यांची नावे पाहणार आहोत.
तीळ आणि गुळाच्या मदतीने तीळाचे लाडू तयार केले जातात.
संक्रांतीला शेंगदाणे आणि गुळाची चिक्की तयार केली जाते.
चणा डाळ आणि गुळ यांचा वापर करून महाराष्ट्राची पारंपारिक डीश पुरणपोळी तयार केली जाते.
मकर चौला ही ओडिशामध्ये तयार केली जाणारी रेसिपी आहे.
तलेर बोरा हा पदार्थ बंगालमध्ये संक्रांतीला तयार केला जातो.
पिट्ठा हा हिवाळ्यात मोठ्या संख्येने खाल्ला जाणारा पदार्थ आहे.