Saam Tv
पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मुल नसलेल्या जोडप्यांना व नवविवाहीत जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते.
एका वर्षात २४ एकादशीचे व्रत केले जातात. त्यात जर अधिकमास असेल तर वर्षात एकूण २६ व्रत केले जातात.
यंदा हे व्रत १० जानेवारीला असणार आहे. या व्रताची सुरुवात ९ जानेवारीला दुपारी १२.२२ मिनिटांनी सुरू होणार आहे. तर शेवट २० जानेवारीला सकाळी १०.१९ वाजता होणार आहे.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी निर्जळ उपवास करणार असाल तर दूध पिणं टाळा.
पुत्रदा एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी मांसाहार, कांदा, लसूण खाऊ नये.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये.
पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी कोणाबद्दल वाईट बोलू नये.