Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी तुम्ही काय खाता? हेच नाही तर तुम्ही कसे खाता? हे देखील महत्वाचे आहे. अनेकांना जेवल्यानंतर लगेचच काही ना काही करण्याची सवय असते ज्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो.
जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे अन्नाचे योग्य प्रकारे पचन होत नाही. यामुळे अॅसिडिटी, पोट फुगणे, छातीत जळजळ होणे आणि वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी प्यायल्यास, त्यातील घटकांमुळे शरीराला अन्नातील लोह ( आणि इतर पोषक घटक योग्य प्रकारे शोषून घेता येत नाहीत.
पोटभर जेवण झाल्यानंतर लगेच धावणे, जिम करणे किंवा जड व्यायाम करणे टाळावे. यामुळे पचनसंस्थेकडे जाणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो आणि पोटदुखी किंवा मळमळ होऊ शकते.
काही लोकांची जेवल्यानंतर लगेच धूम्रपान करण्याची सवय असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर केलेले धूम्रपान सामान्य वेळेपेक्षा १० पट जास्त धोकादायक असते, ज्यामुळे कर्करोग आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार होऊ शकतात.
जेवताना किंवा जेवल्यास लगेच ग्लासभर भरून पाणी प्यायल्यास पोटातील पाचक रस पातळ होतात, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते.
या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी आपल्या खाण्याच्या आणि पिण्याच्या वेळांमध्ये नियमितता आणि सातत्य ठेवा. शरीराचे घड्याळ योग्य असल्यास पोट आणि आरोग्य निरोगी राहते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.