Manasvi Choudhary
आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा सर्व काही सुरळीत सुरू असतानाही अचानक सर्व काही वाईट घडते. मन विचलित होते, सतत थकवा जाणवतो आणि कोणत्याही कारणाशिवाय भीती किंवा अस्वस्थ वाटते.
तुमच्या शरीरात काही तरी बदललं असल्याच्या संकेत तुम्हाला मिळतात.सुरूवातीला यामध्ये हृदयाची धडधड वाढणे, हात थरथरणे ही लक्षणे दिसतात.
अनेक प्रश्न मनात येतात. यामागे काहीतरी गंभीर कारण आहे? का यासाठी तुम्ही वैद्यकीय सल्ला घेता. समुपदेशकांशी चर्चा करता, मात्र तरी देखील कधीकध भावनेचे निराकरण होत नाही. माहितीनुसार, काही अनुभव असे असतात जे नकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य भावना यांच्याशी जोडले जातात. यामागील नेमकी कारणे कोणती ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे सतत चिंतेत राहणे. तुम्ही सतत अतिविचार करत असाल, वाईट परिस्थितीची कल्पना करत असाल किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अस्वस्थ वाटत असेल, तर त्यामुळे छातीत जड वाटणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे ही शारीरिक लक्षणे दिसू लागतात. याचा तुमच्या झोपेवर आणि एकाग्रतेवरही गंभीर परिणाम होतो.
अंगावर काटा येणे, किंवा कोणीतरी आपल्यावर सतत नजर ठेवून आहे अशी तीव्र जाणीव होणे, यांसारख्या गोष्टी अनेकदा मनात भीती आणि गोंधळ निर्माण करतात.
कोणतीही स्पष्ट वैद्यकीय कारणे नसताना प्रकृती बिघडणे ही देखील एक सामान्य समस्या आहे. विविध उपचार करूनही सतत अशक्तपणा, थकवा किंवा अस्वस्थ वाटणे बंद होत नाही. जेव्हा ही लक्षणे तशीच राहतात, तेव्हा चिंता आणि भीती आणखी वाढून आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
अनेकदा अनपेक्षित परिस्थितीचा सामना करावा लागतो. कितीही प्रयत्न केले तरी वारंवार कामात अडथळे येणे, हातातोंडाशी आलेली संधी हुकणे किंवा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणे यांसारख्या समस्यांमुळे मानसिक ताण वाढतो.
अनेकदा आपल्याला अगदी एकटे असल्यासारखे वाटते, नेहमीच गोंधळल्यासारखे, घाबरल्यासारखे किंवा प्रचंड थकल्यासारखे वाटत असले तर ही लक्षणे नकारात्मक उर्जेशी जोडली जात असली, तरी तुमची मूळ मानसिक स्थिती ओळखणे आणि समजून घेणे सर्वात महत्त्वाचे असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.