Manasvi Choudhary
नवरा- बायकोचे नाते हे केवळ प्रेमावरच अवलंबून नसते तर या नात्यात एकमेकांवर विश्वास, समजूतदारपणा महत्वाचा असतो.
नवरा- बायकोच्या नात्यामध्ये अनेकदा कामाच्या ताणामुळे तसेच घरातील जबाबदाऱ्यामुळे एकमेकांना वेळ देता येत नाही यामुळे नाते कमजोर होते. नात्यात दुरावा येतो.
नवरा आणि बायकोच्या नातं मजबूत होण्यासाठी तुम्ही दररोज छोट्या- छोट्य सवयीतून बदल करणे महत्वाचे आहे.
सकाळी उठल्यावर एकमेकांना हसून दिवसाची सुरुवात करा यामुळे नात्यात गोडवा येईल.
कामाच्या गडबडीत एकमेकांसाठी वेळ काढणे कठीण होते. पण दिवसातून किमान अर्धा तास टीव्ही आणि मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारा.
नवरा- बायको एकमेकांच्या कामाचे कौतुक करा यामुळे दोघांनाही छान वाटेल. नात्यातील गोडवा टिकून राहील.
नवरा-बायको दोघेंही एकत्र असले तरी त्यांच्या आवडी- निवडी वेगळ्या असू शकता. यासाठी एकमेकांच्या आवडी- निवडीचा आदर करा.
मित्रांमध्ये किंवा कुटुंबातील कोणासमोरही आपल्या जोडीदाराची टिंगल करू नका.