Manasvi Choudhary
अनेक लोकांना झोपण्यापूर्वी फोन चार्जिंगला लावून सकाळी काढण्याची सवय असते. यामुळे बॅटरी १००% चार्ज झाल्यानंतरही सतत ओव्हरचार्जिंग होत राहते, ज्यामुळे फोन जास्त गरम होतो आणि बॅटरीचे आयुष्य कमी होते.
चार्जर खराब झाल्यानंतर बाजारात मिळणारे अनेक स्वस्त किंवा लोकल बनावट चार्जर वापरतात. या चार्जरमध्ये व्होल्टेज रेग्युलेटर योग्य नसतात, ज्यामुळे फोनचा स्फोट होण्याचा किंवा सर्किट जळण्याचा धोका सर्वाधिक असतो.
फोन चार्जिंगला लावून त्यावर हेवी गेमिंग केल्याने किंवा व्हिडिओ स्ट्रीम केल्याने प्रोसेसर आणि बॅटरीवर अतिरीक्त ताण पडतो. यामुळे फोन अतिशय उष्ण होतो आणि ब्लास्ट होण्याचा धोका वाढतो.
झोपताना अनेकजण मोबाईल उशीखाली किंवा गादीवर ठेवून चार्ज करतात. यामुळे फोनमधून बाहेर पडणारी उष्णता ट्रॅप होते आणि हवा खेळती न राहिल्याने फोन अतिशय गरम होऊन धोकादायक ठरू शकतो
फोनची बॅटरी वारंवार संपवून ती ०% वर आणणे लिथियम-आयन बॅटरीसाठी अत्यंत घातक असते. बॅटरी २५% च्या खाली आली की ती लगेच चार्जिंगला लावणे केव्हाही उत्तम ठरते
जर चार्जिंग पोर्टमध्ये ओलावा असेल आणि तुम्ही त्यात चार्जिंग केबल लावली, तर शॉर्ट सर्किट होऊन फोनच्या मदरबोर्डचे नुकसान होऊ शकते.
वापरामुळे किंवा उन्हामुळे फोन आधीच गरम झालेला असताना त्याला लगेच चार्जिंगला लावू नका. फोन आधी पूर्णपणे थंड होऊ द्या, नंतरच चार्जरला कनेक्ट करा.