Shreya Maskar
कोकणात रत्नागिरी येथे भंडारपुळे बीच वसलेला आहे. गणपतीपुळ्याजवळ असलेला हा सुंदर किनारा नारळी-पोफळीच्या झाडांनी आणि निसर्गरम्य परिसराने सजलेला आहे. सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
सिंधुदुर्ग येथे शांत भोगवे बीच वसलेला आहे. हा निसर्गरम्य समुद्रकिनारा शांत वातावरण, सोनेरी वाळू आणि अथांग समुद्रासाठी ओळखला जातो. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी आणि फोटोशूटसाठी बेस्ट ठिकाण आहे.
दापोली येथे आंजर्ले बीच वसलेला आहे. येथील कड्यावरचा गणपती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. स्वच्छ वाळू, हिरवीगार झाडे आणि शांत किनारा यामुळे आंजर्ले समुद्रकिनारा मन प्रसन्न करणारा अनुभव देतो.
सिंधुदुर्ग येथे खवणे बीच आहे. निळाशार समुद्र, किनाऱ्यावरील खडक, शांत परिसर, फोटोग्राफीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
आरवी बीच श्रीवर्धनजवळ आहे. समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत किनाऱ्यावर फेरफटका मारायचा असेल, तर आरावी बीच उत्तम पर्याय आहे.
रायगड येथे शेखाडी बीच आहे. येथे तुम्हाला ग्रामीण जीवन अनुभवता येईल. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील निवांत वातावरण आणि कोकणी गावांचा साधेपणा अनुभवता येतो.
गावखडी बीच हे रत्नागिरीतील हिडन लोकेशन आहे. कोकणातील समुद्रकिनारे आणि शांत किनारी प्रदेश एक्सप्लोर करायला आवडत असतील, तर गावखडीला भेट देऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.