वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे? हे 7 हेल्दी पदार्थ ठरतील बेस्ट!

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

वजन कमी करण्यासाठी फक्त कमी खाण्यापेक्षा हेल्दी नाश्ता महत्त्वाचा आहे. सकाळचा नाश्ता फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटकांनी युक्त असणे फायदेशीर ठरू शकते.

Breakfast | pinterest

वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावे?


पोहे, उपमा, इडली हे पदार्थ खाल्ल्याने फायदा होऊ शकतो. हेल्दी नाश्ता केल्याने शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि वजनही कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | pinterest

उपमा (Upma)

रवा किंवा ओट्सपासून बनवलेला उपमा हा पचनास हलका आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे पौष्टिक असतो.

upma

पोहा

महाराष्ट्रीयन आवडीने खाणारा पोहा हा हलका, कार्बोहायड्रेट्स आणि आयर्नयुक्त नाश्ता आहे.

Diet Poha | pinterest

इडली

तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनलेली वाफेवर शिजवलेली इडली पचनासाठी अतिशय उत्तम मानली जाते.

Idli | pinterest

ढोकळा (Dhokla)

चणा डाळीच्या पिठापासून वाफेवर तयार केलेला ढोकळा कमी फॅटयुक्त आणि चवदार नाश्ता आहे.

Dhokla | Google

व्हेज सँडविच

भाज्या आणि ब्राऊन ब्रेडपासून तयार केलेले सँडविच फायबर आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असते.

Veg Sandwich | pinterest

मूग चिला

मुगाच्या डाळीचा पोळा हा उच्च प्रथिनांनी युक्त असल्याने वेट लॉससाठी फायदेशीर ठरतो.

Moong Dal Chilla | pinterest

लापशी

दलिया किंवा लापशीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Moong Dal Daliya | Freepik

NEXT: बदामाचे की नारळाचे; केसांच्या वाढीसाठी कोणते तेल सर्वाधिक फायदेशीर? जाणून घ्या

Almond Vs Coconut Oil Benefits For Hair
येथे क्लिक करा...