Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे कारण हवामानातील बदल आणि दमटपणामुळे त्वचा तेलकट होणे, त्वचेवर पिंपल्स येणे, पोअर्स ओपन होणे यासारंख्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी तुम्ही योग्य प्रकारे स्किनकेअऱ रूटीन फॉलो केल्यास त्वचा फ्रेश आणि निरोगी राहण्यास मदत होईल.
पावसाळ्यात त्वचेवर तेलकटपणा आणि घाण साचू शकते यामुळे तुम्ही चेहरा स्वच्छ धुणे महत्वाचे आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा स्वच्छ धुवा.
चेहऱ्याचा पीएच लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी गुलाबजल किंवा अल्कोहोल-फ्री टोनरचा वापर करा. यामुळे चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होणार नाही.
ऑयली स्किन साठी तुम्ही मॉइश्चरायझर लावणे अधिक महत्वाचे आहे. पावसाळ्यात नेहमी जेल-बेस्ड किंवा वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा.
मृत त्वचा घालवण्यासाठी आठवड्यातून १ किंवा २ वेळा हलक्या हाताने नॅचरल स्क्रब किंवा मुलतानी मातीचा पॅक लावा. यामुळे स्किन क्लीन होते
पावसाळ्यात तहान कमी लागल्यामुळे पाण्याची गरज भासत नाही, पण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
कडुनिंबाची पाने आणि हळद किंवा मुलतानी माती आणि रोझ वॉटरचा पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.