ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
एसीचा वापर केल्याने विज बिल जास्त येत असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.
एसीचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसवर सेट करा; ते 18 ते 20 अंश सेल्सिअसवर सेट केल्याने विजेचा वापर वाढू शकतो.
एसीचे फिल्टर खराब झाल्यामुळे कूलिंग कमी होते आणि विज बिल वाढते. यासाठी ३ ते ४ महिन्यांनी एसीची सर्व्हिसिंग करा.
एसी चालू असताना पंख्याचा देखील वापर करा. यामुळे संपूर्ण रुममध्ये थंडी हवा लवकर पसरते. आणि एसीचा वापर कमी होतो.
झोपताना एसी चालू राहिल्याने विजेचे बिल जास्त येऊ शकते. म्हणून एसी टाइमरचा वापर करा.
जास्त स्टार असलेली एसी तसेच विजेचे बचत करणारी एसी खरेदी करा.
मोठ्या रुममध्ये कमी टन म्हणजेच क्षमता असलेली एसी लावल्याने कूलिंग कमी होते आणि एसीची जास्त प्रमाणात वापर होतो ज्यामुळे एसीचे बिल वाढू शकते.