ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा हृदय अचानक काम करण्याचे थांबतो, तेव्हा कार्डियक अरेस्ट येतो. यामध्ये जीव जाण्याचाही धोका असतो. याची लक्षणे कोणती, जाणून घ्या.
जर अचानक छातीमध्ये वेदना होत असतील किंवा जडपणा जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नका. हे हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्टचे लक्षण असू शकते.
अचानक घाम सुटणे, मळमळणे किंवा अस्वस्थ वाटणे हे देखील कार्डियक अरेस्टचे लक्षण असू शकते.
हृदयाचे ठोके अचानक जलद, मंद किंवा अनियमित होत असतील तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
श्वास घेण्यास त्रास होणे हे कार्डियक अरेस्टचे गंभीर लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
कोणत्याही कारणशिवाय जास्त प्रमाणात थकवा जाणवणे हे कार्डियक अरेस्टचे लक्षण आहे.
अचानक चक्कर येणे किंवा शरीराचे संतुलन बिघडणे हे देखील कार्डियक अरेस्टचे मुख्य लक्षण आहे.