Manasvi Choudhary
तोंडाचा कर्करोग हा एक अत्यंत गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. मात्र, हा आजार अचानक होत नाही, तर त्याची लक्षणे हळूहळू शरीरात दिसू लागतात.
तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिले आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर या आजारावर सहज उपचार करू शकता.
तोंडाच्या कर्करोगाची सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत? ती या वेबस्टोरीतून जाणून घेऊयात.
तोंडामध्ये जिभेवर, गालाच्या आतल्या बाजूला किंवा हिरड्यांवर एखादी लहान गाठ किंवा सूज असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
जिभेवर पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे डाग दिसत असतील. हे डाग वारंवार पुन्हा दिसत असतील तर तोडांची तपासणी करणे आवश्यक आहे.
जेवताना वेदना, जळजळ आणि घशाजवळ टोचल्यासारखे वाटत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
जर तुम्हाला गिळताना किंवा बोलताना घशाजवळ त्रास होत असेल घशाचा गंभीर आजार असू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.