Manasvi Choudhary
गुलाबी, मऊ ओठ चेहऱ्याचे सौंदर्य खुलवतात. मात्र सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि तेलकट- तिखट पदार्थांच्या सेवनामुळे केवळ आरोग्यावरच नाही ओठांवर देखील परिणाम होतो.
ओठ काळे होणे, कोरडे होणे या ओठांच्या समस्या निर्माण होतात यासाठी अनेक जण बाजारातील केमिकलयुक्त लिप बाम किंवा क्रीम्स वापरतात ज्यामुळे ओठ आणखी खराब होतात.
नैसर्गिकरित्या ओठ मऊ आणि सुंदर हवे असतील, तर केमिकलयुक्त उत्पादनांऐवजी घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
ओठांची साल निघण्याचे आणि ते कोरडे पडण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता. शरीरात पाणी कमी झाले की ओठ सर्वात आधी सुकतात
साखर आणि मधाचा स्क्रब ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उपाय आहे. मध आणि साखर एकत्र मिश्रणाने ओठांवर हलक्या हाताने १-२ मिनिटे स्क्रब करा.
आयुर्वेदानुसार, दररोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल किंवा बदाम तेलाचे २-३ थेंब टाकल्याने ओठ नैसर्गिकरित्या मऊ होतात
जर तुमचे ओठ काळे पडले असतील, तर काकडीचा रस ओठांवर लावा. काकडी ओठांवरील काळेपणा नैसर्गिकरित्या कमी करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.