ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रवास करताना त्वचेची काळजी घेणे खूप कठीण असते, म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेऊ शकता.
प्रवास करताना वारंवार चेहऱ्याला स्पर्श करु नका. कारण जे बॅक्टेरिया तुमच्या हातात असतात ते तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतात.
प्रवास करताना उन्हाचा धोका असू शकतो, म्हणून सनस्क्रीन वापरा, यामुळे रॅशेस आणि त्वचेची जळजळ टाळता येते.
कुठेही प्रवास करत असाल तरीही पुरेशी झोप घ्या, यामुळे त्वचेच्या समस्या कमी होऊ शकतात.
रात्रीचा प्रवास करताना झोपण्याआधी तुमचा मेकअप रिमूव्ह करा. आणि फेसवॉस करुन झोपा.
प्रवास करताना शरीराला डिहायड्रेट होऊ देऊ नका. यामुळे तुमची त्वचा तेज निघून जातो. म्हणून स्वतःला हायड्रेट ठेवा.