ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
व्हिटॅमिन्स आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. ते केवळ आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवत नाहीत तर त्वचा, केस, हाडे आणि स्नायूंना देखील बळकटी देतात.
शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असेल, विशेषतः बी12 आणि व्हिटॅमिन डी, तर तुम्ही जास्त काम करत नसले तरीही तुम्हाला नेहमीच कमकुवतपणा आणि थकवा जाणवू शकतो.
व्हिटॅमिन बी 7 म्हणजेच बायोटिन आणि बी12 च्या कमतरतेमुळे केसांवर परिणाम होतो. यामुळे केस गळू शकतात किंवा केस लवकर पांढरे होऊ शकतात.
व्हिटॅमिन ए, के आणि ई च्या कमतरतेमुळे त्वचा ड्राय आणि संवेदनशील बनते. त्वचेवर खाज सुटणे, पुरळ येणे किंवा मुरुम येणे अशा समस्या उद्बवतात.
जर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल आणि तुम्हाला वारंवार सर्दी किंवा संसर्ग होत असेल तर हे व्हिटॅमिन सी किंवा डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे शरीराची हिलींग पावर कमकुवत होते. त्यामुळे किरकोळ कट किंवा दुखापत देखील लवकर बरी होत नाही.