ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंग्या अन्नाच्या शोधात घरात येतात. म्हणून घरात स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. परंतु मुंग्यांना पळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.
मुंग्यांच्या मार्गावर लिंबाचा रस किंवा साल लावा. त्याचा वास मुंग्यांना दूर पळवून लावतो.
मुंग्यांच्या मार्गावर व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रणाचे फवारणी करा. यामुळे मुंग्या येणार नाहीत.
मुंग्यांच्या मार्गावर दालचिनी पावडर किंवा तेल लावा.
मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने किंवा तेल उपयुक्त ठरु शकते.
मुंग्या आकर्षित होऊ नयेत म्हणून अन्नाचे तुकडे आणि गोड पदार्थ ताबडतोब स्वच्छ करा.
मुंग्या मारणारा खडू किंवा स्प्रे काळजीपूर्वक वापरा, आणि अन्नपदार्थांपासून दूर रहा.