ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दररोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. हे पोटातील गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करते.
कोमट पाणी शरीरातील पचनाची गती वाढवते. तसेच यात लिंबू आणि मध घालून प्यायले तर आणखी फायदेशीर ठरते.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागात ऑक्सिजन आणि पोषक तत्वे योग्यरित्या पोहोचतात.
गरम पाणी नसांना आराम देते, ज्यामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळतो. ते स्नायूंनाही आराम देते आणि मानसिक ताण कमी करते.
कोमट पाणी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. यामुळे इन्फेक्शन, सर्दी आणि इतर आजारांपासून बचाव होतो.
कोमट पाणीमुळे शरीरातील जळजळ कमी होऊन नसांमधील ताण कमी होतो. ज्यामुळे संधिवात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.