ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा उष्णतेपासून आराम देतोच, पण त्यामुळे अनेक आजारही होतात. पावसाळ्यात ताप, सर्दी, खोकला, पोटाच्या समस्या आणि त्वचेचे संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
पावसाळ्यात प्रदूषित पाणी आणि दूषित अन्न यांचा रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावे, जाणून घ्या.
तुळशीची पाने, आलं, लवंग आणि हळद घालून पाणी उकळवून गाळून घ्या. हा काढा सकाळी प्या. तुळशीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात.
हळद ही एक नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिक्स करुन प्या. यामुळे सर्दी आणि खोकला टाळता येतो आणि झोप देखील चांगली लागते.
आवळा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. तुम्ही आवळा कच्चे खाऊ शकता किंवा याचा ज्यूस रिकाम्या पोटी पिऊ शकता. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय, तुम्ही पाण्यात ओवा किंवा कापूर घालून वाफ देखील घेऊ शकता. यामुळे नाक, कान आणि घसा स्वच्छ होतो.