ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डायबिटीज होण्याआधी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. परंतु आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.
डायबिटीज होण्याआधी जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त वाढते. या स्थितीली प्री डायबिटीज स्टेज म्हणतात.
सामान्यपेक्षा जास्त तहान लागणे हे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे संकेत आहे.
जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. तेव्हा किडनी शरीरातील अतिरिक्त साखर लघवीमार्गे बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
जेव्हा ब्लड शुगर लेव्हल वाढते तेव्हा अंधुक दिसणे किंवा डोळ्यांना सूज येऊ शकते.
जर तुमच्या शरीरावर एखादी जखम झाली असेल आणि ती भरण्यासाठी सामान्यपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर हे डायबिटीज असण्याचे संकेत आहे.
जेव्हा शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते तेव्हा ग्लुकोज प्रोसेस्डच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. अशावेळी एखाद्या व्यक्तीला आराम केल्यानंतरही थकवा जाणवतो.