ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. यासाठी केसांची योग्य काळजी गेणे गरजेचे आहे.
माइल्ड म्हणजेच सौम्य शॅम्पूने आठवड्यातून दोनदा केस धुवा.
केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा जास्त प्रमाणात वापर करु नका.
नारळाच्या तेलाने स्कॅल्प मसाज करा. यामुळे स्कॅल्प मजबूत होतो.
पावसाच्या पाण्यात केस भिजू देऊ नका. यामुळे केस ड्राय होऊन केस गळण्याची समस्या वाढते.
शॅम्पूने केस धुतल्यानंतर कंडीशनर वापरा. यानंतर केसांना हेअर सीरम लावा.
पावसाळ्यात योग्य आहाराची काळजी घ्या. आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे केसांना पोषण मिळते.