ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने भेडींची चविष्ट भाजी बनवली जाते.
भेंडीचे पाणी ग्लुकोज नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरू शकते. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहण्यास मदत होते.
दररोज सकाळी भेंडीचे पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था मजबूत होते.
व्हिटॅमिन ए, सी आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भेंडीच्या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
भेंडीचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर ठरु शकते. यामध्ये जास्त फायबर आणि कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे पोट भरलेले वाटते.
भेंडीचे पाणी प्यायल्याने किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.