Shruti Vilas Kadam
पंपकिन सीड्समध्ये प्रोटीन, फायबर, ओमेगा-३ फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखे पोषक घटक असतात. हे सीड्स हलके भाजून खाण्याचा सल्ला दिला जातो.
अळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्समध्ये अनेक पोषक घटक असतात. याचा अधिक फायदा मिळवण्यासाठी अलसीचे बी पूर्ण खाण्याऐवजी बारीक वाटून किंवा पावडर करून खावे, असे न्यूट्रिशनिस्टने सांगितले आहे.
चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. हे सीड्स खाण्यापूर्वी किमान ३ ते ४ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यानंतर त्यांचे सेवन करणे योग्य ठरते.
तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी त्याचा आहारात समावेश करता येतो. तीळ तडका देऊन किंवा भाजून खाल्ल्यास त्यातील हेल्दी फॅट्स आणि पोषक घटक मिळण्यास मदत होते.
हलीम किंवा अळीवाच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. त्यांचे सेवन करण्यासाठी बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात आणि सकाळी त्यांचे सेवन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
सूर्यफूलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. या बिया कच्च्या स्वरूपातही खाता येतात. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त मानले जाते.