ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळांचा राजा असलेला आंब्याचा सगळेच आतुरतेने वाट बघत असतात. या उन्हाळ्यात तुम्ही आंब्यापासून काही स्पेशल डिशेस बनवू शकता.
आंब्याचा पल्प आणि गूळापासून बनलेले आंबट गोड आम पापड या उन्हाळ्यात नक्की बनवा.
रसरशीत हापूस आंब्याच्या पल्पपासून बनवा आम रस आणि गरमागरम पुरीसोबत सर्व्ह करा.
कडक उन्हात थंडावा मिळावा यासाठी आंब्यापासून बनवा हेल्दी मॅंगो लस्सी, लस्सी घट्ट करण्यासाठी तुम्ही दहीचा देखील वापर करु शकता.
मंबाझा सांबा हा आंध्र प्रदेशचा पदार्थ आहे. या सांबारची चव गोड आंबट आणि तिखट असते. यामध्ये आंबा आणि चिंचचा वापर केला जातो.
आंबा पुलिसरी ही केरळची क्रिमी करी डिश आहे. आंबा आणि नारळाचा वापर करुन हा पदार्थ बनवला जातो.
हा एक पारंपारिक पदार्थ आहे. आंब्याची प्युरी, दूध, वेलची पूड आणि ड्राय फ्रुट्स घालून ही खीर बनवली जाते.