Manasvi Choudhary
चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल तरुणांमध्येही हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वेगाने वाढत आहे.
कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होतात, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.यासाठी आजपासूनच तुम्ही काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
बिस्किटे, केक, खारी, पेस्ट्री आणि कुकीज यांसारख्या बेकरीच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर फॅट वाढवणारे घटक असतात. हे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवते.
समोसे, भजी, चिप्स हे तळलेले पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. या पदार्थांच्या सेवानाने फॅट वाढतो. हे फॅट नसांच्या भिंतींवर जमा होते, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि रक्तदाब वाढतो.
दूध, क्रीम, चीज, बटर या पदार्थांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते.दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी चांगले असले, तरी हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी ते खाणे टाळावे.
व्हाईट ब्रेड, मैदा, पास्ता या पदार्थांत शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात त्यामुळे खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.