ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पनीर हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पनीर खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. परंतु, जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने आरोग्यावर कोणते परिणाम होतात, जाणून घ्या.
पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्याने वजन वाढू शकते.
पनीरमध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते तर फायबरचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पनीर पचायला वेळ लागतो. जास्त पनीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
पनीरमध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आढळते. जास्त कॅल्शियममुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी पनीरचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण, यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते.
जास्त प्रमाणात कच्चे पनीर खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोका वाढतो. पनीर नेहमी स्वच्छ जागेवरुनच विकत घ्या.