Manasvi Choudhary
आपण सर्वजण प्लास्टिकच्या बॉटलचा वापर पाणी पिण्यासाठी करतो. थंडीच्या दिवसात प्लास्टिकच्या बॉटलमधून गरम पाणी पिले जाते. मात्र तुम्हाला माहितीये का प्लास्टिकच्या बॉटलमधून गरम पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायल्याने त्यातील प्लास्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे जास्त वेळ गरम पाणी ठेवल्याने कर्करोग होण्याची शक्यता असते.
गरम पाणी प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असल्याने प्लास्टिकमधून निर्माण होणारी बीपीए आणि इतर हार्मोनल असंतुलन करणारी रसायने निर्माण होतात.
प्लास्टिकमधून पडणारे विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ शकतात यामुळे यकृत आणि मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो.
प्लास्टिकमधील विषारी पदार्थामुळे त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकते त्वचेवर सुरकुत्या आणि कोरडेपणा येतो.
प्लास्टिकमधील रसायने शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम करू शकतात यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
काही संशोधनानुसार, प्लास्टिकमधून बाहेर पडणारे रसायने न्यरोलॉजिकल मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.