ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल लोक सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ वाया घालवतात, तसेच रील्स पाहण्याचे एका प्रकारचे व्यसन लागले आहे.
जर तुम्हीही तुमचा फोन वारंवार रील्स पाहण्यासाठी उघडत असाल तर तुम्हीही रील्सचे व्यसन लागले आहे, ही सवय सोडवण्यासाठी तुम्ही हे उपाय करु शकता.
दररोज रील्स पाहण्यासाठी एक निश्चित वेळ ठेवा. यामुळे मेंदूला एक पॅटर्न मिळेल.
सोशल मीडिया अॅप्स, जसे की, इंस्टाग्राम, फेसबूक आणि शॉट्स सारख्या अॅप्सचे नोटिपिकेशन बंद करा.
रील्स पाहण्यात घालवलेला वेळ कमी करा आणि वाचन, व्यायाम किंवा कोणत्याही तुमच्या आवडत्या छंद जोपासण्यात तो वेळ घालवा.
रील्स पाहण्याचे व्यसन कमी करण्यासाठी, आठवड्यातून एक दिवस पूर्ण ब्रेक घ्या तसेच कोणत्याही डिव्हाइसपासून दूर राहून मनाला विश्रांती द्या.
रील्स पाहण्याऐवजी, ध्यानाद्वारे तुमचे मन स्थिर करा, ज्यामुळे डिजिटल डिस्ट्रॅक्शन कमी होईल.