Shreya Maskar
बोटातून घट्ट अंगठी काढण्यासाठी साबण, जेल, हँड लोशन, तूप, शॅम्पू यांचा वापर करा.
तूप, जेल, हँड लोशन असे सर्व तेलकट पदार्थ बोटाला चोळा आणि अलगद अंगठी काढा.
बर्फाच्या पाण्यात हात टाकून ठेवा. त्यानंतर अंगठीला फिरवून हळू-हळू काढण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही खोबरेल तेलच्या मदतीने देखील बोटात अडकलेली अंगठी काढू शकता.
अंगठी काढल्यानंतर बोटे कोमट पाण्याने धुवा. नाहीतर ॲलर्जी होऊ शकते.
तसेच बोटाला बॉडी लोशन लावा म्हणजे लाल झालेले बोटाला आराम मिळेल.
अडकलेली अंगठी काढण्यासाठी बाटावर जास्त ताण देऊ नका , नाहीतर जखम होऊ शकते.
काही केल्या बोटातून अंगठी निघत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.