ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॅन्सर हा एक प्राणघातक आजार आहे. आजकाल कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये अपेंडिक्स कॅन्सरचाही समावेश आहे.
अपेंडिक्स कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कोणती, जाणून घ्या
जर तुम्हाला पोटाच्या उजव्या खालच्या भागात वेदना होत असतील तर याकडे दुर्लक्ष करु नका.
पोटात सूज येणे किंवा पोट वारंवार फुगणे हे अपेडिंक्स कॅन्सरचे लक्षण आहे.
पोट सतत जड वाटत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे अपेडिंक्स कॅन्सरचे लक्षण असू शकते. तसेच वारंवार तीव्र ताप येणे हे देखील कॅन्सरचे लक्षण आहे.
अपेंडिक्स कॅन्सरचे सामान्य लक्षण म्हणजे, कोणत्याही कारणाशिवाय सतत उलट्या होणे.
अपेंडिक्स कॅन्सर असल्यास अचानक वजन कमी होऊ शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.