Manasvi Choudhary
सध्या उन्हाचा तडाका चांगलाच वाढलेला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा पारा 40 अंशावर पोहोचलेला आहे.
वाढत्या तापमानामुळे AC खरेदीत वाढ झालेली आहे. बाजारात AC घेण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे.
अशातच तुम्ही देखील नवीन AC खरेदी करणार असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
नवीन AC खरेदी केल्यानंतर जास्तीत जास्त वीज बचत करण्यासाठी काय केले पाहिजे,किती स्टार रेटिंग असलेली AC खरेदी करायची? हे प्रश्न तुम्हाला देखील असतील तर खालील टिप्स जाणून घ्या.
अनेकजण AC खरेदी करताना फक्त ब्रँड तपासतात मात्र एसीची कुलिंग नीट होण्यासाठी त्यातील महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं देखील महत्वाचे आहे.
बाजारात AC च्या अनेक वैशिष्ट्ये आहेत. 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार AC असतात. 5 स्टार AC मध्ये अॅडवान्स टेक्नॉलॉजी असल्याने विजेची बचत होते. तर 3 स्टार AC ची किंमत कमी असते मात्र वीज जास्त खेचते.
यानुसार तुम्ही देखील AC चा वापर अधिक करणार असाल तर 3 स्टार AC पेक्षा 5 स्टार AC बेस्ट असेल.
5 स्टार AC कमी स्टार असलेल्या AC च्या तुलनेत खोली लवकर थंड करते तापमान नियंत्रित ठेवते असे दिसून येईल.
स्टार रेटिंग AC म्हणजे स्टारची संख्या जितकी जास्त असेल तितकी उपकरणाची ऊर्जा कार्यक्षमता जास्त असेल.
जर तुम्ही AC चा वापर काही तासानंसाठी करणार असाल तर, 3 स्टार AC बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही पूर्ण दिवस ACचा वापर करणार असाल तर 5 स्टार AC बेस्ट असेल.