त्वचेमध्ये दिसणाऱ्या 'या' 5 बदलांकडे कधीही दुर्लक्ष करू नका

Manasvi Choudhary

त्वचा

त्वचा हा शरीरातील महत्वाचा भाग आहे. बदलत्या ऋतूमानानुसार त्वचेची काळजी घेणे गरजेचे आहे.

Skin Warning Signs

त्वचेच्या समस्या

सूर्याची किरणे, वाढते प्रदूषण आणि हार्मोनल बदल याचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचा काळी पडणे, त्वचेवर फोड येणे, पुरळ येणे, मुरूमे येणे यासारख्या समस्या उद्भवतात.

Skin Problem

या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका

त्वचेमध्ये विशिष्ट बदल झाले की त्वचा सतत संकेद ते या संकेताकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.

Major Skin Problem

त्वचा कोरडी होणे

त्वचेतील कोरडेपणा, त्वचेतील ओलावा कमी होणे हे देखील त्वचेचे नुकसानीचे परिणाम आहे. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काळजी घेणे महत्वाचे आहे.

Dry skin

त्वचेवर मुरूमे येणे

त्वचेवर मुरूमे येणे ही समस्या हार्मोनल बदल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे होते. तेलकट- तिखट पदार्थांचा परिणाम त्वचेवर होतो.

forehead pimples

त्वचेवर सुरकुत्या येणे

अनेकदा तरूणवयात देखील त्वचेवर सुरकुत्या येतात. त्वचेवर सुरकुत्या येणे ही समस्या त्वचेवरील मृत पेशीमुळे निर्माण होते यासाठी तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करणे महत्वाचे आहे.

Reduces wrinkles | yandex

त्वचा लालसर होणे

अनेकदा त्वचा लालसर होते, जळजळते. कोणत्याही केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापरामुळे त्वचेचे हे परिणाम दिसून येतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्टस वापरणे टाळा.

Skin Redness | Social Media

काळे डाग दिसणे

कामाचा ताण, प्रवास यामुळे त्वचा काळी पडते, त्वचेवर काळे डाग येतात. हे डाग घालवण्यासाठी तुम्ही चांगल्या दर्जाची सनस्क्रिन वापरणे महत्वाचे आहे.

Black Spots | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल! वजन कमी करण्यासाठी रोज प्या 'काळ्या चण्यांचे' गरमागरम सूप

येथे क्लिक करा...