Manasvi Choudhary
आजकाल अनेकजण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. वाढत्या वजनामुळे आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.
सतत बसून काम करणे, व्यायाम न करणे, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ही वजन वाढीची मुख्ये कारणे आहेत.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीने घरीच व्यायाम केला पाहिजे.
दररोज नियमितपणे ३० ते ४० मिनिटे वेगाने चालणे. हा सोपा व्यायाम करून तुम्ही लवकरात लवकर वजन घटवू शकता.
दोरी उड्या हा अत्यंत सोपा व्यायामाचा प्रकार आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कधीही तुम्ही दोरी उड्या मारू शकता यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.
सूर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि चयापचय वेगवान होते, ज्यामुळे झपाट्याने वजन कमी होते.
त्रिकोणासन हे आसन पोटाच्या बाजूची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. यामुळे कंबर लवचिक होते आणि पचनशक्ती सुधारते.