डार्क सर्कल्स आणि डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी 5 टिप्स

Manasvi Choudhary

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स

डोळ्यांखालील काळी वर्तुळे म्हणजेच डार्क सर्कल्समुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसतो, ज्यामुळे चेहऱ्याचे नैसर्गिक तेज कमी होते.

Dark Circle Remove Tips | Social Media

सोप्या टिप्स

यासाठी तुम्ही दररोज मेकअप करण्यापूर्वी महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता.

Dark Circle Remove Tips

पुरेशी ७ ते ८ तास झोप घ्या

अपुरी झोप हे डार्क सर्कल्स होण्याचे सर्वात मुख्य कारण आहे. दररोज पुरेशी ७ ते ८ तासांची झोप घेतल्यास डोळ्यांवरील ताण कमी होतो आणि काळी वर्तुळे हळूहळू नाहीशी होतात.

less sleep | pinterest

बर्फाचा शेक लावा

डोळ्यांच्या सुजेसाठी आणि थकवा दूर करण्यासाठी सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळून डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने शेक द्या. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

Applying Ice On Face

सनस्क्रिनचा वापर करा

घराबाहेर पडताना धूळ, प्रदूषण आणि सूर्यप्रकाश किरणांपासून डोळ्यांच्या नाजूक त्वचेचे संरक्षण करा, सनस्क्रिन लावा.

Apply Sunscreen for Dust & Pollution | Saam tv

स्क्रीन टाईम कमी करा

मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीसमोर सतत तासनतास बसल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. यासाठी कामाच्या दरम्यान थोडा ब्रेक घ्या आणि डोळ्यांना विश्रांती द्या.

Reduce Screen Time

कोणतेही प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा

डोळ्यांखाली कोणतीही नवीन क्रीम, सीरम किंवा घरगुती उपाय करण्यापूर्वी हातावर छोटी पॅच टेस्ट नक्की करून पहा, जेणेकरून त्वचेची कोणतीही अ‍ॅलर्जी होणार नाही याची खात्री होईल.

Patch Test | Yandex

NEXT: तुम्हालाही छातीत जळजळ आणि आंबट ढेकरचा त्रास होतोय? ॲसिडिटी कमी करण्यासाठी 10 सोप्या टिप्स

10 tips to reduce acidity and heartburn
येथे क्लिक करा...